Advertisement

सिक्सर किंग युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम?

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू, भारताने २०११ साली जिंकलेल्या वर्ल्डकपचा स्टार आणि सिक्सर किंग युवराज सिंग सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम?
SHARES

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू, भारताने २०११ साली जिंकलेल्या वर्ल्डकपचा स्टार आणि सिक्सर किंग युवराज सिंग सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. युवराजने दक्षिण मुंबईतील हाॅटेलमध्ये एक पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत तो आपल्या निवृत्तीची घोषणा करेल, असं म्हटलं जात आहे. 

फाॅर्म गमावला 

भारताने २०११ साली पटकावलेला वन डे वर्ल्ड कप आणि २००७ सालच्या टी २० वर्ल्डकपमध्ये युवराजने मोलाचं योगदान दिलं होतं. परंतु वाढत्या वयानुसार फाॅर्म गमावलेला युवराज मागील काही काळापासून टीम इंडिया बाहेरच होता. ३० जून २०१७ रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वन डे सामना खेळला होता. एवढंच नाही, तर आयपीएलमध्येही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे बहुतांश सामने त्याला बाकावर बसूनच बघावे लागले. 

परदेशातून निमंत्रण 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराजला कॅनडातील जीटी-२०, आयर्लंडमधील युरो टी-२० स्लॅम आणि हॉलंडमध्ये खेळण्याच्या ऑफर आहेत. बीसीसीआयशी सलग्न नसलेल्या इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. तर काही स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवृत्तीची आवश्यकता असते, त्यामुळे युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. 

बीसीसीआयची परवानगी

काही दिवसांपूर्वी इरफान पठाणनेदेखील कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बीसीसीआयची परवानगी न घेताच आपलं नाव नोंदवलं होतं. सध्या इरफान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असल्याने बीसीसीआयने त्याला कॅरेबिय लीगमधून आपलं नाव मागे घेण्याची सूचना केली आहे. हे नियम आपल्याबाबत आडवे येऊ नयेत, याची काळजी घेत, युवराज निवृत्ती पत्करण्याची शक्यता आहे.

 ३७ वर्षांच्या युवराजने ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय, ५८ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.  



हेही वाचा-

दुहेरी हितसंबंध प्रकरणात सचिनला क्लीन चीट



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा