कांदीवली - प्राध्यापक ललित दामजी देढीया आणि त्यांच्या पत्नीचं अपहरण करणाऱ्यांना कांदीवली पोलिसांनी अटक केलीय. मोहम्मद सलीम शेख आणि सुनील सिंह असं या आरोपींचं नाव असून, या दोघांनी या दाम्पत्याला मारहाण करत त्यांचं अपहरण केलं होतं. अजून एक आरोपी हमिद हैदर काझी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेता आहेत. प्राध्यापक ललित देढीया कांदीवली लिंक रोडवरून बोरीवलीला जात होते. या दरम्यान त्यांची कार एका रिक्षाला आदळली. यावेळी नुकसान भरपाई म्हणून 30 हजारांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. पैसे देण्यास देढीया यांनी नकार दिल्यानं त्यांना मारहाण करत त्यांच्या पत्नीचं अपहरण करण्यात आलं.