मुंबई - एअर इंटेलिजन्स युनिटने वेगवेगळ्या कारवायांत मुंबई विमानतळावर परदेशी चलनाचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणांत चौघांना परकीय चलन विनिमय कायद्यान्वये (फेमा) अटकही करण्यात आली आहे.
कशी झाली कारवाई?
हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशाकडून 1 लाख 39 हजारांचे सौदी रियाल, 56 हजारांचे दिऱ्हॅम आणि 14000 ऑस्ट्रेलियन डॉलर जप्त.
शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख युसूफ पाशा हे तिघे गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाहून परतले होते. काळ्या बाजारात उखळ पांढरं करण्यासाठी त्यांनी हे परकीय चलन आणलं होतं. विशेष म्हणजे कस्टम्समध्ये सापडू नये, यासाठी त्यांनी या नोटा वर्तमानपत्रात गुंडाळून बॅगेत लपवला होता.
दुसऱ्या एका कारवाईत एआययूने 25 लाखांच्या नवीन 2000च्या नोटांसह एका भारतीयाला अटक केली. आरिफ कोयंते असं त्याचं नाव असून तो दुबईला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आलंय. 25 लाखांच्या या नोटा 52 पाकिटांमध्ये विभागून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर ही 52 पाकिटं 13 कार्डबोर्डमध्ये ठेऊन कपड्यांच्या मदतीनं लपवण्यात आली होती.