मालाड - पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारला पोलिसांच्याच गाडीने धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यासमोर कार पार्क केली होती. तेव्हा 16 जानेवारीला दुपारी दोन वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या कारचे मालक मनोहर चौधरी यांनी याची तक्रार मालवणी पोलिसांत केली असता आधी तक्रार घेण्यास नकार दिला, पण मनोहर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विनंती केल्यानंतर पोलिसांनी फक्त चालकाविरोधात एनसी दाखल केली. पण पुढची कारवाईच केली नसल्याचा आरोप मनोहर चौधरी यांनी केला.