बदलापूर प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, सचिव पोलिसांच्या ताब्यात

कोतवाल आणि आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती.

बदलापूर प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, सचिव पोलिसांच्या ताब्यात
SHARES
ठाणे (thane) गुन्हे शाखेने बुधवारी बदलापूर येथील शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. दोघांनाही पुढील चौकशीसाठी एसआयटी पथकाकडे सोपवण्यात आले आहे.

बदलापूर शाळेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची तक्रार न केल्याबद्दल बदलापूर (badlapur) शाळेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोक्सोच्या (POCSO) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एसआयटीने (SIT) दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. 

कोतवाल आणि आपटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायलयाने ती याचिका फेटाळली होती. हे दोघे अनेक दिवसांपासून एसआयटी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांपासून लपून बसले होते.

ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील म्हणाले, "आम्हाला अशी माहिती मिळाली की, ते कर्जतला जामिनासाठी एका व्यक्तीला भेटण्यासाठी येणार होते. त्यामुळे आम्ही गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आणि कर्जत येथे सापळा रचला. आम्ही त्यांना ठाण्यात आणले आणि आता पुढील तपासासाठी त्यांना एसआयटीच्या ताब्यात दिले आहे.



हेही वाचा

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

पश्चिम रेल्वेवर 12 नवीन फेऱ्या सुरू होणार, टाईमटेबल...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा