मालाड रेल्वे स्थानकाजवळ आढळला महिलेचा सांगाडा

मालाड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या पुढील झाडं- झुडपं तोडण्याचं काम सुरु अाहे. हे काम सुरू असताना सोमवारी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास कामगारांना महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला.

मालाड रेल्वे स्थानकाजवळ आढळला महिलेचा सांगाडा
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकजवळ महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला अाहे. या महिलेचं नाव अद्याप समजलं नसून बोरिवली रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


झुडपात मृतदेह

मालाड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीनची लांबी वाढवण्याचं काम सुरू आहे. यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या पुढील झाडं- झुडपं तोडण्याचं काम सुरु अाहे. हे काम सुरू असताना सोमवारी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास कामगारांना महिलेच्या मृतदेहाचा सांगाडा सापडला. त्यांनी तात्काळ याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवला.


मृतदेहाची अवहेलना

मात्र, काही कारणात्सव मृतदेह शताब्दी रुग्णालयातून भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाला. पण भगवती रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतदेहाची दखल न घेता जे. जे. रुग्णालयात पाठवण्यास सांगितले. शुक्रवारी या मृतदेहाचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिली.



हेही वाचा -

विवाहितेचा विनयभंग करणारा रोडरोमियो जेरबंद

म्हाडात घर मिळवून देण्याच्या नावाखाली व्यायवसायिकाला लाखोंचा गंडा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा