देशात कोरोना सारख्या संसर्गाला आठोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना, दुसरीकडे दिल्लीतील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमला उपस्थित राहून, सरकारच्या आवाहानंतर ही पुढे न आलेल्या 150 तब्लिकींविरोधात मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269 व 270 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तब्लीकी जमातचे धार्मिक संमेलनात राज्यातून 1062 जण गेल्याचे निदर्शनास आले आहे. 13 ते 15 मार्चला दिल्लीतील निजामुद्दीन भागातील केंद्रात(मरकज म्हणजे केंद्र) येथे हे संमेलन पार पडले. या संमेलनाला देशाच्या सर्वच राज्यांमधील व्यक्तींची उपस्थिती होती. डंप डाटानुसार पोलिसांनी त्यातील 890 जणांची ओळख पटवली.त्यातील 576 जणांना तातडीने विलगीकरण कक्षात हलवत त्यांची तपासणी केली असता. त्यातील 4 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागन झाली असून यातील 2 अहमदनगर तर 2 पिंपरी चिंचवडचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यातील दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलीगी जमात मरकजला सभागी झालेल्या 150 व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे करण्यात आले. पण देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामुहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमीर अनिस रेहमान खान, फैयाज शिरगावकर, अली हुसेन रहिमतुत्ताशेख, मो. नाहिद अहमद शेख, इस्माईल इब्राहिम सिद्दीकी, अब्दुल अजिज खान, मोहम्मद हमजा, सरफराज मोदी, मोहम्मद अल्ताफ खान, सोहेल मोहम्मद मुक्तार पटेल यांच्यासह 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्यावतीने अग्निशमन दलाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार साथीचा रोग पसरवण्यास मदत केल्याप्रकरणी, तसेच कार्याक्रमाकाल उपस्थित राहूनही माहिती लपवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक साथीचा रोग घोषित केले होते. तसेच त्या पार्श्वभूमवर 11 मार्चपासून राज्यात विविध कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आले होते. त्यानंतरही आरोपींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साथ पसरेल असे कृत्य केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईत अनेक ठिकाणी 150 तबलिगीशी संबंधीत व्यक्तींचे विलीगीकरण करण्यात आले आहे. त्यातील सांताक्रूज येथील बडी मस्जिद 20 लोकांना तर वांद्रे येथील झरिना सोसायटी येथे 12 लोकांना विलीगीकरण करण्यात आले. वांद्रे येथील 12 लोक इंडोनेशिया मधून आली होती.तर बडी मस्जिद मधील लोकं गुजरात,राजस्थानची होती. 30 मार्चला यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांना कोरोन्टाईन केलं.मात्र अजून तपासण्या करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय इतर व्यक्तींच माहिती घेण्याचे कामही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यांना 14 दिवस कोरोन्टाईन केलं आहे.
तबलीगींना माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी, दिल्लीमधील आयोजित तबलीगी मरकजचा भाग असलेल्या सर्वांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांक 1916 वर प्रवासाची तपशील माहिती द्यावी अशी विनंती, पोलिसांकडून करण्यात आली आहे. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, अशा इशाराही पोलिसांनी दिला आहे
तब्लिकी संमेलनात सहभागी झालेल्यांची अशी पटवली ओळख
त्या यादीतील भ्रमणध्वनी क्र मांक जिल्हावार विभागातून पोलीस आयुक्तालय किं वा जिल्हा अधिक्षक कार्यालयाला पुरविण्यात आले. त्यानुसार मुंबईला सुमारे दिडशे भ्रमणध्वनी क्रमांक प्राप्त झाले आहेत. भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून संबंधीत व्यक्तीची चौकशी आणि वैद्यकीय चाचणी केली जात आहे.