मुंबईच्या जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात बुधवारी पून्हा 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या पूर्वी ही त्याच पोलिस ठाण्यातील 12 पोलिसांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका मागोमाग पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ते मनातून कुठे ही खचून जाऊ नयेत, म्हणून गुरूवारी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यातला भेट देत, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्याचे मनोबल वाढवले. राज्यातील एकूण 531 पोलिसांना कोरोना लागणा झाली असून त्यातील एकट्या मुंबईतील सुमारे 250 पोलिसांचा समावेश आहे.
त्या पार्श्वभूमिवर करोनाशी लढणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वत: जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्याचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त(दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) निशित मिश्रा, उपायुक्त(परिमंडळ-1) संग्रामसिंग निशाणदार हे देखील यावेळी आयुक्तांसमवेत होते.
कोरोनाशी लढण्याची जबाबदारी आपल्यावर असून आपला विजय निश्चित होणार अशा विश्वासही यावेशी सिंग यांनी व्यक्त केला. गुन्हेगारांचे कंबरडे मोडणा-या पोलिसांची लढाई आता अशा शस्त्रुसोबत आहे, जो दिसत नाही. यापूर्वी धारावी, वरळी कोळीवाडा येथे सिंग यांनी भेट देऊन पोलिसांचे मनोधैर्य़ उंचावले होते.
कोरोना सारख्या जीवघेण्या परिस्थितीत देखील योद्धांप्रमाणे आपले कर्तव्य चोख बजावताना पोलीस कर्मचारी दिसत आहेत. या कोरोनाच्या लढाईत पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. गरजूंना मदत करण्यापासून ते नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चोप देण्यापर्यंत पोलिसांचा अनेक लोकांशी संपर्क येत असतो. अशा परिस्थितीत सतत लोकांच्या संपर्कात आल्याने जे.जे मार्ग पोलीस ठाण्यातील 26 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी 12 पोलीस जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील पॉझिटिव्ह आले होते. तर 54 जणांना क्वारंनटाइन केले होते. मात्र सध्या 26 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर या 26 पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी सर्व पोलीस जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील पीएसआय आणि पीआय दर्जाचे अधिकारी असल्याने जे जे पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.