मुंबईतील गोरेगाव पश्चिम (goregaon) येथे फिजिओथेरपिस्ट महिला आणि तिचा नवरा मृतावस्थेत आढळून आला आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह (dead body) तिच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये सापडला तर तिचा नवरा त्यांच्या इमारतीच्या आवारात मृतावस्थेत आढळला.
गोरेगाव पश्चिम (goregaon) येथील ललित हॉटेलच्या मागे असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या बेडरूममध्ये डॉक्टर राजश्री पेडणेकर यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. तर पती किशोर हा इमारतीच्या आवारात मृतावस्थेत आढळून आला.
प्राथमिक तपासात किशोरने पत्नीचा गळा आवळून खून (murder) केला आणि नंतर आत्महत्या (suicide) केल्याचा संशय आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जोगेश्वरी (jogeshwari) येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
गोरेगाव पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना प्रथम किशोरचा मृतदेह सापडला. त्याच्या छातीजवळ एक चावी ठेवली होती. त्याची ओळख पटल्यानंतर, पोलिसांनी त्याच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आत प्रवेश करताच राजश्रीचा मृतदेह आढळला. ज्यावरून तिचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासादरम्यान किशोरला नैराश्य आणि इतर काही आजारांनी ग्रासल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. डॉ राजश्री मालाडस्थित एका आरोग्य संस्थेत सराव करत होत्या. त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो. हे कठोर पाऊल उचलण्यापूर्वी किशोरने नातवाईकांना मॅसेज पाठवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
हेही वाचा