डोंगरीतून १३५ किलो सोनं जप्त, भंगारातून तस्करीचा डाव फसला

दक्षिण मुंबईतील डोंगरी या परिसरात डीआरआयने शुक्रवारी सायंकाळी मोठी कारवाई करत, तब्बल १३५ किलो सोने डीारआयने जप्त केले

डोंगरीतून १३५ किलो सोनं जप्त, भंगारातून तस्करीचा डाव फसला
SHARES

दक्षिण मुंबईतील डोंगरी या परिसरातून डायरेक्टर आॅफ रेव्हेन्यू अँड इंटिलिजन्स (डीआरआय)नं शुक्रवारी सायंकाळी मोठी कारवाई करत, तब्बल १३५ किलो सोनं  जप्त केलं आहे. परदेशातून हे सोनं तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आरोपींनी यााधीही २०० किलो सोन्याची तस्करी केल्याची कबुली त्यांच्या जबाबात दिली आहे. 


भंगारात लपवून तस्करी

परदेशातून वितळविण्याजोग्या वेगवेगळ्या धातूंच्या भंगारात लपवून तब्बल १३५ किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती डिआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, ‘डीआरआय’नं या तस्करीचं हे रॅकेट उध्वस्त करत निसार अलियार (४३), शोएब मेहमूद झरोदरवाला (४७), अब्दुल अहाद झरोदरवाला (२६), मनोज जैन (३२), अकील फ्रूटवाला (३९), शेख अब्दुल अहाद (३२) व हॅप्पी धाकड यांना अटक केली आहे.


सराफा बाजारात विक्री

मुंबईतील काही व्यक्तींकडून परदेशातून सोन्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरु असल्याचं आणि या सोन्याची घाऊक सराफा बाजारात विक्री होत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी डोंगरी परिसरात सापळा लावून एक होंडासिटी कार आणि होंडा अ‍ॅक्टिव्हाला अडवून चौकशी केली त्यावेळी पोलिसांना गाडीमध्ये तब्बल ७५ किलो सोनं आढळलं.

त्यानंतर प्राथमिक चौकशी अंती या तस्करांनी मागील काही दिवसात ६० कोटी रुपयांचं तब्बल २०० किलोहून अधिक सोन्याची तस्करी केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, होंडा सिटीमध्ये तीन डिस्कमध्ये ४५ किलो तर होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरमध्ये दोन डिस्कमध्ये ३० किलो सोनं लपविण्यात आलं होतं. या ७५ किलो सोन्याची किंमत सुमारे २४ कोटी ५० लाख रुपये आहे.


४० लाखांची रोकड जप्त

याबाबत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, निसार हा परदेशातून सोन्याची तस्करी करुन आणत होता. त्याच्याकडून झरोदरवाला घेऊन ते कमिशनवर राजू ऊर्फ मनोज जैन याच्यासह अनेक ग्राहकांना विकत होता. या सोन्याचे पैसे अकील फ्रूटवाला हा हवालामार्फत दुबईला पाठवत होता. त्याशिवाय हॅप्पी धाकड याला देखील सोनं विकल्याची माहिती निसार यानं दिली.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी झरोदरवाला याच्या घरी व कार्यालयांवर छापे टाकून ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्याचप्रमाणं, परदेशातून वेगवेगळ्या धातूंचे भंगार आयात करुन त्यात दडवून तस्करी केली जात असल्याचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरु असावा असा डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.



हेही वाचा-

आईला भेटायला आला आणि भुरट्या चोरांचा बळी ठरला

अनैतिक संबंधातून बापाकडून ५ वर्षाच्या मुलाची हत्या



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा