घोडबंदर इथे सावत्र बापाने पत्नीच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलाची हत्या केली. या घटनेत मणक्याचे फ्रॅक्चर आणि अंतर्गत जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चितळसर (chithalsar) पोलिसांनी मोहम्मदविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद दिलशाद मोहम्मद इम्रान (23) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीने पहिल्या लग्नापासून असलेल्या मुलाला त्यांच्यासोबत घरी राहण्यासाठी आणले.
घोडबंदर(ghodbunder road) येथील चितळसर मानपाडा भागातील एमएमआरडीएच्या (mmrda) इमारतीत भाड्याच्या घरात मोहम्मद आपल्या पत्नीसमवेत राहत होता. महिलेला पहिल्या पतीपासून साडेचार वर्षांचा आर्यन नावाचा मुलगा होता. मोहम्मदला याची माहिती नव्हती.
काही महिन्यांपूर्वी महिलेने आर्यनला आपल्यासोबत राहण्यासाठी आणले होते. त्यामुळे मोहम्मद त्याच्यावर सतत अत्याचार आणि मारहाण करत असे.
28 जुलै रोजी महिला कामानिमित्त बाहेर गेली असताना. सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहम्मदने आर्यनला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने त्याला लोखंडी पलंगाच्या दिशेने ढकलले. त्यामुळे त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. मोहम्मदने त्याच्या पोटावरही मारहाण केली. त्यानंतर यकृत आणि किडनीमध्ये रक्ताची गुठळी होऊन मुलाचा मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आले होते.
मात्र, पोलिसांनी वैद्यकीय अभिप्राय घेतल्यानंतर ही हत्या असल्याचे उघड झाले. त्यानंतर मंगळवारी चितळसर पोलिसांनी मोहम्मदची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आर्यन त्याच्यासोबत राहत असल्याने त्याने ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा