नागरिकांची विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी कहरच केला आहे. फसवणूकीसाठी त्यांनी चक्क सायबर सेलच्या नावानेच बनावट ट्विटर अकाऊन्ट उघडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या काळात सोशल मिडियावर लक्ष ठेवताना, सायबर पोलिसांना हे बनावट ‘ट्विटर अकाऊन्ट’ नजरेस आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचाः- कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण
ऐरवी सायबर भामट्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन करणाऱ्या पोलिसांचाच वापर करून या भामट्यांनी फसवणूक करण्याची एक नवी क्लुप्ती शोधून काढली. मात्र वेळीच हीबाब पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. राज्यातील सर्व सायबर पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलची स्थापना करण्यात आली. ही यंत्रणा सध्या राज्यातील नोडल संस्था म्हणून काम पाहते. या सायबर सेलच्या माध्यमातून राज्यात सायबर गुन्ह्यांबद्दल जागृती निर्माण करण्यात येते. त्यासाठी सप्टेंबर २०१७ पासून महाराष्ट्र सायबर सेलने अधिकृत ट्वीटर अकाउंट सुरू करण्यात केले होते. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सोशल मिडियावर काही समाज कंटकांनी अफवा पसवण्यास सुरूवात केली. तर अनेकांनी परिस्थितीचा फायदा घेत सायबर चोरी सुरू केली. या सर्वांपासून नागरिकांना सतर्क आणि सावधान ठेवण्यासाठी सायबर सेल दररोज सोशल मिडियावर लक्ष ठेवून असते. त्यावेळी सोशल मीडीयावर लक्ष ठेवत असताना. त्यांना सायबर सेलच्याच नावाचे एक हुबेहुब ट्विटर अकाऊन्ट दिसून आले.
हेही वाचाः- वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी
हे ट्विटर अकाऊन्ट नागरिकांच्या फसवणूकीसाठी वापरण्यासाठी सुरू केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या बनावट ट्विटर अकाऊन्टवर सायबर सेलचा लोगो असल्याने अनेकांनी त्याअकाऊन्टला फाँलो देखील केले. सायबर सेलच्या अधिका-यांच्या हिबाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष केंद्रीत केले. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक रुपाली बोबडे यांच्या तक्रारीवरून नुकतीच कफ परेड पोलिसांनी भादवि कलम ४१९ (तोतयागिरी करणे) व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.