पित्यानेच (father) आपल्या तीन मुलांना (children) आईस्क्रीम (ice cream) मध्ये उंदीर मारण्याचं औषध (rat poison) मिसळून खायला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर २ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई (mumbai) तील मानखुर्द (mankhurd) मध्ये ही हृदय पिळवटणारी घटना घडली आहे. घरातील वादातून या व्यक्तीने आईस्क्रीमधून उंदीर मारण्याचे औषध त्याच्या तीनही मुलांना दिल्याचं समोर आलं आहे. मुलांच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बापावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अली असं आरोपीचं नाव आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून चिडलेल्या मोहम्मद अली यानं आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळलं. यामध्ये ५ वर्षांचा अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. तर ७ वर्षांची अलीना आणि २ वर्षांचा अरमान यांच्यावर मानखुर्दमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -
मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद
डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद