कांदिवली - कांदिवली समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी रात्री 5 दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. या आगीत 3 दुचाकी संपूर्ण जळून खाक झाल्या आणि 2 दुचाकी अर्ध्या जळाल्या.
समतानगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी रहिवाशांचीही चौकशी केलीय. तर, लवकरच आरोपीला पकडू असं आश्वासन पोलिसांनी दिलंय.