३९ कोटिंच्या कोकेनसह परदेशी तस्कर अटकेत

हस्तगत केलेलं कोकेन हे अफगाणिस्तानहून आणल्याची कबूली त्यांनी दिली आहे. जोहान्सबर्ग व्हाया युरोपला कुरिअर मार्गे हे ड्रग्ज पाठवले जाणार होते.

३९ कोटिंच्या कोकेनसह परदेशी तस्कर अटकेत
SHARES

मुंबईत कोकनची तस्करी करणाऱ्या टोळीचा आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकानं पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी 39 कोटिंचे कोकेन हस्तगत करत, एका परदेशी महिलेसह तीन तस्करांना अटक केली आहे. जोहान्सबर्ग व्हाया युरोपला कुरिअर मार्गे हे ड्रग्ज पाठवले जाणार होते.

सापळा रचून अटक

ब्राझिलियन तस्कर महिला कार्लो पिंटो आयरिस ही या टोळीची प्रमुख असल्याचं तपासात पुढे आलं आहे. तर सायमन अगोबत्ता, मायकल संदे होप, निरस अॅझुबिक ओखोवो हे नायझेरियन तिच्यासाठी काम करत होते. अंबोली परिसरात काही ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आंबोली पोलिसांचे विशेष पथक अंधेरीच्या मौर्या इस्टेट रोडवर साध्या वेशात गस्त घालत होते. ड्रग्ज तस्करीसाठी कार्ले आणि तिचे तीन हस्तक आले असताना पोलिसांनी चौघांना रंगेहाथ अटक केली.

अफगणिस्तानहून ड्रग्सची तस्करी

पोलिसांना चौघांजवळ मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळून आले. कार्लेच्या चौकशीत तिनं ती नवी मुंबईच्या कौपरखैरानं सेक्टर 19च्या मिनाक्षी निवासमध्ये राहत असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. त्यावेळी तिच्या घरातून 6 किलो 492 ग्रॅम कोकेन, हस्तगत केले आहेत. हे सर्व टुरिस्ट व्हिजावर भारतात आले होते. हस्तगत केलेलं कोकेन हे अफगाणिस्तानहून आणल्याची कबूली त्यांनी दिली आहे. या आधीही कार्ले आणि निरसला तस्करी प्रकरणी अटक केली होती. भायखळा जेलमध्ये ठेवण्यात आल्याची कागदपत्रे त्यांच्याजवळ आढळून आली आहेत. 



हेही वाचा

Exclusive : नेत्याच्या मुलीची बदनामी करणाऱ्यास अटक

मुंबई पोलिस आयुक्त पदी कोणाची वर्णी लागणार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा