मुंबईत कुत्रेही सुरक्षीत नाहीत, ४ गर्दुल्ल्यांनी केला गँगरेप?

एक रिक्षा चालक मालवणी चर्च परिसरातून जात असताना त्याला जवळच्या झाडीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. रिक्षा थांबवून तो झाडीजवळ गेला असता तिथं ४ गर्दुल्ले कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचं त्याला दिसलं.

मुंबईत कुत्रेही सुरक्षीत नाहीत, ४ गर्दुल्ल्यांनी केला गँगरेप?
SHARES

मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात ४ विकृतांनी एका कुत्र्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे चारही जण गर्दुल्ले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मालाड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात कुत्र्याला मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला हा कुत्रा पाहिल्यानंतर एका रिक्षाचालकाने त्याला उचलून 'अॅनिमल मॅटर टू मी' संस्थेच्या रुग्णालयात दाखल केलं.


कुत्र्यावर अत्याचार

संबंधित रिक्षा चालक मालवणी चर्च परिसरातून जात असताना त्याला जवळच्या झाडीतून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. रिक्षा थांबवून तो झाडीजवळ गेला असता तिथं ४ गर्दुल्ले कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचं त्याला दिसलं. हा धक्कादायक प्रकार बघून त्याने आरडाओरड केल्यावर या चारही गर्दूल्ल्यांनी तिथून पळ काढला.

त्यानंतर रिक्षाचालकाने प्राणीमित्र महिलेच्या मदतीने जखमी अवस्थेतील कुत्र्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या या कुत्र्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा-

'संस्कारी बाबूजीं'वर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल

तिहेरी तलाकप्रकरणी मौलानाला अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा