चिंचपोकळी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या एच.पी.पेट्रोल पंप येथील पंपात बिघाड होऊन शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात गॅस गळतीला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात गॅसचा वास पसरला. लगेचच गॅस कंपनीचे कर्मचारी आणि इंजिनिअर पोहोचले आणि त्यांनी गॅस गळती आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.