डोंबिवलीत तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. चार्मीने सकाळी ८.५३ ची लोकल डोंबिवली स्थानकात पकडली.

डोंबिवलीत तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू
SHARES

मुंबईतील लोकल ट्रेनच्या गर्दीचा आता आणखी एक बळी गेला आहे. डोंबिवली स्थानकातील जीवघेण्या गर्दीने एका तरूणीचा जीव घेतला आहे. सोमवारी डोंबिवलीत २२ वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. चार्मी पासाद असं या मृत तरुणीचं नाव आहे.

डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. चार्मीने सकाळी ८.५३ ची लोकल  डोंबिवली स्थानकात पकडली. मात्र, प्रचंड गर्दीमुळे चार्मीला आतमध्ये जाता आलं नाही. ती लोकलच्या दरवाजाच्या बाहेर लटकून राहिली. गर्दीच्या रेट्यामुळे कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन ती पडली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतंच लोकसभेमध्ये डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. लोकलमधील गर्दीमुळे डोंबिवलीकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे डोंबिवलीत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली होती. लोकलच्या या गर्दीने आता एका तरूणीचा बळी घेतला. 



हेही वाचा -

अमेरिकेहून आलेल्या सूनेची सासूने केली झोपेतच हत्या

विरारमध्ये मोबाइल शॉपमधील गोळीबारात २ जण जखमी




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा