वडाळाच्या सायन म्हाडा काॅलनी परिसरातील काजल ज्वेलर्सवर अनोळखी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. या लुटीत चोरट्यांनी तब्बल २ कोटी रुपयांचे दागिने चोरले अाहेत. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे गुजरातचे असलेले काजल ज्वेलर्सचे मालक महेंद्र मंदावर गुरूवारी दुपारी २. ३० वा. नेहमीप्रमाणे जेवण्यासाठी दुकान बंद करून गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानातील २ कोटींचे दागिने चोरून नेले. महेंद्र हे दुपारी ३. ३० वाजताच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना दुकानातील सामान अस्तावस्त पडलेलं आढळलं. त्यावेळी त्यांना दुकानातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलाविले. मात्र चलाख चोरांनी सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन चोरल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -
स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर डल्ला
मंत्रालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न