सुशांतच्या मृत्यूचे रहस्य शोधणे म्हणजे सीबीआयला गवतातून सुई शोधण्यासारखे आहे. कारण घटना घडली त्यावेळी घेतलेले फोटो आणि आताची वास्तविक परिस्थिती यात जमीन आसमानच अंतर आहे. तसेच, या प्रकरणात सुरुवातीपासूनच हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने मुंबई पोलिसांनी हाताळले आहे. ज्यामुळे अनेक गोष्टींची सांगड घालताना आणि पुरावे शोधताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचाः- सुशांत आत्महत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक तयार
सुशांत आत्महत्येचा तपास करताना सीबीआयला सुरूवातीपासून म्हणजे सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसापासून ते आतापर्यंत घडलेल्या नाट्यमय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. या प्रकरणाचा तपास हा त्या वेळी काढण्यात आलेल्या उपलब्ध फोटोंच्या आधारे करण्यासारखा नाही. त्यामुळे सीबीआयला पून्हा घटनास्थळाला भेट देणे भाग आहे. त्यातच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळावरील अनेक गोष्टी हलवल्या आहेत. तर आत्महत्येनंतर सुशांतच्या खोलीत अनेकांनी वावर केला. अशा परिस्थितीत एखादा पुरावा नष्ठही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचाः- सीबीआय गुरुवारी घेणार सुशांतच्या घराची झडती
विशेष म्हणजे घटनास्थळी असलेला सुशांतचा मृतदेहवरून जितका बारकाईने तपास करता येईल, तितका आत्महत्येचे फोटो पाहून करता येणार नाहीत. तसेच, कॅमेरामध्ये घटनास्थळी कुठली गोष्ट कुठे होती. ते शोधणे फार कठीण आहे. उदाहरणार्थ, सुशांतची पलंग कुठे होती. तो कोणत्या स्थितीत होता, त्याचे शरीर कसे लटकले होते, त्याच्या गळ्यातील खुणा काही कापड किंवा पट्टिकाच्या आहेत. फोटोवरून हे ओळखणे देखील फार कठीण आहे सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासाला उशीर देखील होईल कारण मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ज्या कुणाची चौकशी केली. त्या सर्वांचे जबाब हे मराठी भाषेत नोंदवलेले आहे. त्याचे मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यास वेळ लागेल. त्याचबरोबर, मुंबई पोलिस या प्रकरणात सीबीआयला किती सहकार्य करते हे पाहणे ही औत्सुक्याचे राहणार आहे. विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यू पाहणारा कोणही प्रत्यक्षदर्शी नाही, फक्त एकच माणूस आहे ज्याने मृतदेह लटकलेला पाहिला. ते पाहिल्यानंतर त्याने प्रथम पोलिसांना पाचरण करणे अपक्षेत होते. मात्र तसे न करता त्याने मृतदेहही काढून टाकला. त्यामुळे मृतदेह कोठे लटकला होता आणि त्याचे पाय कुठे होते. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी सीबीआयला अनेक अडचणी येतील.