नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक


नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक
SHARES
ड्रग्ज पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'चे मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर NCB ने बुधवारी समीर खान याला रात्री उशिरा अटक केली. तब्बल११ तासाच्या चौकशी नंतर समीरला अटक केली आहे. समीर हे राजकिय एका 
बड्या नेत्याचे जावई आहेत.


 करण संजनानीच्या चौकशीत समीर खान याचे नाव समोर आले होते. करण संजनानी आणि समीर यांच्यात 'गुगल पे'च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना मंगळवारी चौकशीसाठी समन्स बजवण्यात आलं होतं. त्यानुसार बुधवारी समीर हे NCB  कार्यालयात सकाळी १० वा. चौकशीला
 हजर राहिला होता. एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजनानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी यांच्याशी समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,' याची माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आल्याचं कळतयं

दरम्यान समीरच्या चौकशीतून NCB ला मिळालेल्या माहितीच्या आधारे NCB ने वांद्रे परिसरात एक कारवाई करत  एका संशयितला ताब्यात घेतल्याचं कळते. त्याचाही ड्रग्ज प्रकरणात सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा