भयंकर! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार

हा मुलगा 9 वर्षांचा असून सध्या त्याला मानसिक धक्का बसला आहे.

भयंकर! सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार
SHARES

मुंबईच्या उपनगरात सार्वजनिक शौचालयात नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी त्याच्या 15 वर्षीय साथीदाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 1 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे.

नऊ वर्षांचा मुलगा मित्रांसोबत त्याच्या घरी खेळत होता. तेव्हा 24 वर्षीय आरोपी तरुण त्याच्याकडे गेला. त्याला काही कामाच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर तो त्याला सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला. तिथे त्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पीडित मुलाने आरडाओरडा सुरू केल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्यानुसार मिळत (Mumbai Crime News) आहे. मुंबईमधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलगा घरी गेला अन् लपला. आता पुन्हा खेळायला कधीही बाहेर जाणार नाही, असं त्याने आईला सांगितलं. विश्वासात घेतल्यानंतर त्याने आईला घडलेली (Sexually Assaulting Minor Boy) घटना सांगितली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने थेट पोलीस ठाणं गाठलं.

2 मे रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. याप्रकरणी अनैसर्गिक गुन्हा, प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी धमकी आणि भारतीय दंड संहिता आणि मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत 2 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला (Sexually Assaulting) आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपीला ओळखलं. एक पथक पाठवून त्याला 5 मे रोजी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या साथीदाराला देखील अटक (Crime News) केली आहे. आरोपींनी यापूर्वी देखील असं काही कृत्य केलं आहे का, याची पोलीस चौकशी करत आहेत.हेही वाचा

Dombivli MIDC Blast: कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे पाठोपाठ मुंबईत अल्पवयीन मुलाकडून अपघात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा