पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांना दहशतवादी हल्ल्याची धमकी (threat) मिळाली, असे मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितले.

पंतप्रधान (prime minister) परदेश दौऱ्यावर जात असताना मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन (threat call) आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबई (mumbai) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे.

11 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. ज्यामध्ये पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. 

तसेच आरोपीला मुंबईच्या चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. "मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे," असे पोलिसांनी पुढे म्हटले आहे.

विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान 10 फेब्रुवारी रोजी फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले होते. त्यांनी मंगळवारी एआय शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवले. पंतप्रधान बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी अमेरिकेला रवाना होणार आहेत.



हेही वाचा

कुर्ला बेस्ट बस अपघात "आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा"

दहिसर टोल नाक्यावर सकाळी 'या' वेळेत जड वाहनांना बंदी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा