मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसलेल्या चोरट्याला कोणतेही मौल्यवान वस्तू न सापडल्यानं त्यानं चक्क महिलेचा मुका घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील कुरार भागात एक अजब चोरीची घटना घडलीय. मुद्देमाल नसल्याने थेट महिलेचा मुका घेऊन पळ काढला आहे. 3 जानेवारीला आरोपीविरोधात विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चोरट्याला अटक केली आहे. घरात किमती मुद्देमाल न सापडल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 'पीडित महिला एकटी घरी होती. नंतर आरोपी चोरटा थेट घरात घुसला. चोरटा जसा घरात घुसला त्यानं सर्वात आधी दरवाजा आतून बंद केला. नंतर चोरट्यानं पीडित महिलेचे तोंड दाबून ठेवले. नंतर चोरट्याने त्या महिलेला घरात कुठे मौल्यवान वस्तू आहेत, याची विचारणा केली.
महागडे वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड नेमके कुठे ठेवले आहेस? असा प्रश्न चोरट्याने महिलेला धमकावत विचारला. त्यानंतर पीडित महिलेने घरात किमती मुद्देमाल नाही, असं सांगितलं. तेव्हा चोरटा घराची तपासणी न करता थेट पीडित महिलेचा मुका घेतला अन् चोरटा पसार झाला.
ही घटना घडल्यानंतर, पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. सगळी माहिती कुरार पोलीस ठाण्यातील पोलिसांना दिली.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहत असून, बेरोजगार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा