पुनाळेकर, भावेच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ

डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पुनाळेकर, भावेच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ
SHARES

डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या आधी दोघांना १ जूनपर्यंत कोठडी सुनावली होती. शनिवारी मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोठडीत वाढ करण्यात आली. 

दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने याआधी सचिन अंदुरे आणि हिंदू जनजागृती समितीचा सदस्य वीरेंद्र तावडे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीच्या आधारे पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने अटक केली. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटकेत असेल्या शरद कळसकरच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव पुढे आले होते. पुनाळेकर हिंदू विधिज्ञ परिषदेचा सचिव आहे. तर भावे हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये ४ जून २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी भावेला १० वर्षांची शिक्षा झाली होती. तो जामिनावर होता. 



हेही वाचा -

तुम रिझर्व्ह कॅटेगरी से हो ना, असं म्हणत पायलचा जातीवाचक छळ

डेटींगच्या नावाखाली 'सीए'ला ३ लाखांना गंडवलं




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा