प्रेयसी निरु रंधवाला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहली अटकेत अाहे. याप्रकरणी आपल्यावरील गुन्हा रद्द करावा यासाठी अरमान कोहलीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्विकारली असून अरमानची सुटका करण्याचे अादेश तुरूंग प्रशासनाला दिले आहेत. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
सुनावणीवेळी अरमान कोहलीने उच्च न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली. आपल्याला याचा पश्चाताप होत असल्याचं अरमान यावेळी म्हणाला. अरमान कोहलीच्या कुटुंबियांनी नीरु रंधावा हिच्याशी यशस्वी तडजोड केल्यामुळे रंधवाने अरमान विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. निरु रंधवा हिने कोहली कुटुंबियांकडून ठरलेली रक्कम स्वीकारली अाहे. यावेळी निरु रंधवा सुनावणीवेळी न्यायालयात हजर होती.
आरमान कोहलीला समाजसेवा म्हणून १ लाख रूपये टाटा मेमोरियलच्या लहान मुलांसाठीच्या शाखेला देण्याचे आणि १ लाख रूपये नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडला देणगी म्हणून देण्याचे आदेश यावेळी उच्च न्यायालयलाने दिले.
हेही वाचा -
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बाॅम्बची अफवा
लोकलच्या प्रवासात मुलगी विसरल्याचं ऐकलंय का कधी? मग हे वाचा...