लोअर परळ - भोईवाडा माने मास्तर बस थांब्यांवर शुक्रवारी रात्री 12 वा विजेची तार पडल्यानं तीन जणांना शॉक लागला. हितेश आराद, उदय देठे, आणि मेहुल आराद अशी या तिघांची नावे आहेत. यामध्ये हितेश आराद यांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले. या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तर ही घटना दुकानदारानं बाहेर सोडून ठेवलेल्या विजेच्या तारे मुळे झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय. या घटनेचा अधिक तपास भोईवाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सुरुलकर हे घेत आहेत. याबाबत बेस्ट जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांच्याशी चर्चा केली असता या बस थांब्यावरील स्ट्रीट लाईट पोल तपासण्यात आला असता कुठेही शॉक लागत नाही. तर या बस थांब्यांवर विद्युत पुरवठाच नाही, त्यामुळे या अपघाताचा बेस्टशी कोणताही संबंध नसल्याचं गोफने यांनी स्पष्ट केलंय.