नळबाजार - सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना गुटख्याची अनधिकृत विक्री करणाऱ्या एका वाहनचालकाला व्ही. पी. रोड पोलिसांनी शनिवारी अटक केली. कन्हैय्या सिंग (26) असं आरोपीचं नांव आहे. व्ही. पी. रोड पोलिसांना मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला असता नळबाजार परिसरातून एमएच-04-जीसी-3642 ही महिंद्रा पिकअपची गाडी ताब्यात घेतली. ज्यामधून 3 लाख 66 हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त करत पोलिसांनी तात्काळ चालक कन्हैय्याला अटक केली. यासंदर्भात पुढचा तपास सुरू असल्याचं व्ही. पी. रोड पोलिसांनी सागितलं.