पीएमसी बँकेच्या प्रशासकपदी ए. के. दीक्षित

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) प्रशासकपदी युनियन बँकेचे माजी महाव्यवस्थापक ए. के. दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पीएमसी बँकेच्या प्रशासकपदी ए. के. दीक्षित
SHARES

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) प्रशासकपदी युनियन बँकेचे माजी महाव्यवस्थापक ए. के. दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमसीबाबत नेमका तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांनी नियुक्ती केली आहे.

आरबीआयने याआधी पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून जे. बी. भोरीया यांची नियुक्ती केली होती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना ही जबाबदारी पार पाडणं शक्य होत नसल्याने. त्यामुळे त्यांच्या जागी दीक्षित यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोठा आर्थिक तोटा झाल्यामुळे अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेला त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि बँकेचे लाखो ठेवीदार व गुंतवणूकदार यांना दिलासा देण्यासाठी आरबीआय सातत्याने प्रयत्न करत आहे.

आतापर्यंत आलेल्या विविध पर्यायांवर आरबीआयने विचार केला. बँकेची थकीत कर्जे वसूल करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. नेमका तोडगा काढला जावा यासाठी दीक्षित यांची नवे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी आरबीआयने भोरीया यांची पीएमसी बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.



हेही वाचा -

केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार ५५५० कोटी

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा