येस बँकेतील ग्राहकांना दिलासा, बॅकेवरील निर्बंध दूर

येस बँकेच्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार

येस बँकेतील ग्राहकांना दिलासा, बॅकेवरील निर्बंध दूर
SHARES

खासगी क्षेत्रातील येस बँकेची सेवा आज दोन आठवड्यांनंतर पूर्ववत सुरु झाली. रिझर्व्ह बँकेने आज संध्यकाळी सहा वाजता निबर्ंध दूर केले. यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत.बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने ५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता निबर्ंध घातले होते. ३ एप्रिलपयर्ंत खातेदारांना ५0 हजार रुपयांपयर्ंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

हेही वाचाः- Coronavirus: थुंकणाऱ्यांकडून तब्बल  १,०७,००० हजार रुपयांचा दंड वसूल

बुधवारी बँकेवरील निबर्ंध दूर झाले असून ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. खातेदारांकडून पैसे काढण्याची शक्यता लक्षात घेत बँकेने ३0 हजार कोटींची तरतूद केली आहे. ज्यात २२000 कोटींच्या सरकारी बँकांमधील ठेवी आणि ९000 कोटींचे आंतरबँक कर्जे आहेत. येस बँकेचे ग्राहक उद्या, बुधवारपासून सर्व बँकिंग व्यवहार करू शकतील, असे बँकेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली. ग्राहकांनी गुरुवारपासून बँकेच्या नेहमीच्या कालावधीत व्यवहार करावेत. बँकेच्या डिजिटल बँकिंग सेवा व मंच यांचाही ग्राहकांना वापर करता येईल, असे बँकेने म्हटल आहे.

हेही वाचाः- ३१ मार्चपर्यंत माथेरानमध्ये पर्यटकांना 'नो एन्ट्री'

निफ्टी ठरवणार्‍या ५0 कंपन्यांमधून येस बँकेचे नाव १९ मार्चपासून वगळले जाणार आहे. आर्थिक संकटात येस बँक सापडल्यामुळे अनेक बँकांनी तिच्यात गुंतवणूक केली आहे. मात्र ही गुंतवणूक केवळ बँकेला आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठीच करण्यात आली आहे, असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटल होतं. येस बँक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी, सुभाष चंद्रा, नरेश गोयल यांना समन्स जारी केले. अनिल अंबानी यांच्या समूहाने जवळपास १२ हजार ८0८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवले व त्यात परदेशी रकमेचा दुरुपयोग झाल्याचा ईडीचा संशय आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा