अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय CBI च्या तपासाला आता वेग आला आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती भोवती सीबीआयने फास आवळण्यास सुरूवात केली आहे. सीबीआयने सुशांतचा मॅनेजर सॅम्युअलची चौकशी केली. त्यावेळी त्याने रियाही सतत संपर्कात असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने रिया आणि सॅम्युलच्या फोन्सचे डिटेल्सचा सीडीआर CDR मिळवला असून त्यातून ही गोष्ट पुढे आली आहे. आता त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याचं गुपीत उलगडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.
हेही वाचाः- लाॅकडाऊन पूर्णपणे काढून टाका! मनसेच्या सर्वेक्षणाचा कौल जाहीर
सॅम्युएल हा सुशांतच्या घरातील व्यवहार आणि खर्चाची तसेच बँकांची कामं पहायचा. त्यामुळे सीबीआय आता सॅम्युल आणि रियाच्या CDRचा अभ्यास करत आहे. सॅम्युएल हा सुशांतचा मॅनेजर असला तरी तो सतत रियाच्या जास्ती संपर्कात असायचा असे दोघांच्या सीडीआरमधून पुढे आले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांना DRDO येथे बोलावलं होतं. सॅम्युल हा सतत रियाच्या का संपर्कात असायचा याचा उलगडा करण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रिया ही सॅम्युएला दिवसातुन अनेकदा फोन करायची. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. जून महिन्यात रियाने सॅम्युएलला ६ तारखेला फोन केला होता. यावेळी ती सॅम्युएल सोबत १२१ सेकंद बोलली. त्यानंतर सॅम्युलने रियाला फोन केला तेव्हा दोघे १०३ सेकंद बोलले. सर्वात महत्वाचं म्हणजे ६ जून नंतर रियाने सॅम्युएला थेट १४ जुलै २०२० रोजी फोन केल्यांचं स्पष्ट झालं आहे. यावेळी दोघांचं ११९१ सेकंद म्हणजे सलग २० मिनिट बोलणं झालं आहे. या संभाषणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न आता सीबीआय करत असून त्यातून बरीच माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचाः- सुशांत सिंहचं नाव सध्या मोदींपेक्षाही चर्चेत
दरम्यान या प्रकरणात सीबीआयने तपास अधिकारी वांद्रे पोलिसांभोवती ही फास आवळला आहे. वांद्रे पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सीबीआयचा तपास आता अधिकाऱ्यांदिशेने वळला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या पोलिसांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र वांद्रे पोलिस ठाण्यातील१२ ते १३ अधिकारी हे कोरोना संक्रमित असल्याने उपचार घेत आहे. त्यात सुशांत आत्महत्या प्रकरणात तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांचा ही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.