'तेजस्विनी' पथकाकडून रेल्वे प्रवाशांवर कारवाई

रेल्वेनं विनातिकीट प्रवास करू नका असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, तरिही अनेक जण रेल्वेनं विनातिकीट प्रवास करत आहेत.

'तेजस्विनी' पथकाकडून रेल्वे प्रवाशांवर कारवाई
SHARES

रेल्वेनं विनातिकीट प्रवास करू नका असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, तरिही अनेक जण रेल्वेनं विनातिकीट प्रवास करत आहेत. अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जवळपास ५ हजारांहून अधिक महिला प्रवाशांवर मध्य रेल्वेच्या 'तेजस्विनी' महिला तिकीट तपासनीसांनी कारवाई केली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२० पर्यंत तेजस्विनी पथकानं ५ हजार ११९ विनातिकीट प्रवासी पकडले असून, १३ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सध्यस्थितीत मुंबई लोकलनं सर्वसामान्यांना प्रवासास मुभा नाही. परंतू, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह महिलांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, १७ ऑगस्ट २००१ मध्ये 'तेजस्विनी' तिकीट तपासणी पथक स्थापन करण्यात आलं. मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात आणि महिला डब्यात विनातिकीट प्रवासी आणि अनियमितता शोधण्यासाठी हे पथक कार्यरत झालं. २०१९-२० या आर्थिक वर्षांत तेजस्विनी पथकाच्या कामगिरीत दंडाच्या बाबतीत २०१८-१९ च्या तुलनेत २४.६९ टक्के वाढ झाली.

जवळपास ३ कोटी ४३ लाख रुपये प्राप्त झालं. १ लाख १७ हजार केसेसच्या तुलनेत या वर्षी १ लाख २४ हजार केसेसची नोंद झाली. त्यातच कोरोनाकाळात सप्टेंबर ते नोव्हेंबपर्यंत विनातिकीटची ५ हजार ११९ प्रकरणंही शोधून काढली आहेत. 

'तेजस्विनी' पथकाने मागील वर्षी फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी ७५ लाख रुपयांच्या दंडवसूल केला होता, तर यंदा आतापर्यंत ३ कोटी ४३ लाखांचा दंडवसूल केला असून, सुमारे ६८ लाख रुपये जास्तीचे वसूल केले आहेत. मागील वर्षी एक लाख १७ हजार केसच्या तुलनेत या वर्षी एक लाख २४ हजार केसची नोंद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार जास्तीच्या केस दाखल केल्या आहेत. तेजस्विनी पथकाकडून केल्या जाणाऱ्या तिकीट तपासणीमुळे गेल्या काही वर्षांत अतिरिक्त भाड्याच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा