वीज बिलावरून भाडेकरूकडून घरमालकाची हत्या

या प्रकरणी 63 वर्षीय आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे.

वीज बिलावरून भाडेकरूकडून घरमालकाची हत्या
SHARES

वीज बिल भरण्याच्या वादातून भाडेकरूने घरमालकाची हातोड्याने हत्या केली. ही घटना गोवंडीत घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या घरमालकाचा राहत्या घरी मृत्यू झाला. दोन दिवसांनी घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी 63 वर्षीय आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे.

गणपती झा (49) असे मृताचे नाव असून तो बैगनवाडी परिसरात राहत होता. गुरुवारी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन दिवसांपूर्वी झा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर मृताचा चुलत भाऊ दिनेश झा याने चौकशी केली असता त्याचे भाडेकरू अब्दुल शेख (63) याच्याशी वीज बिलावरून भांडण झाल्याचे समजले.

शेख याने गणपती झाला काठी आणि हातोड्याने मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानुसार दिनेश झा यांनी शिवाजी नगर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अब्दुल शेख याला अटक केली.हेही वाचा

नराधमाने केला महिलेवर बलात्कार, पत्नीने काढला व्हिडीओ

मानखुर्द : नराधमाने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत लपवला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा