दादर चौपाटी येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. ही तिन्ही मुले माहिममधील वुलन मिल महापालिका शाळेतील आहेत. भरत हनुमंता (१३), अनुप यादव (१६) आणि रोहित यादव (१५) अशी तिघांची नावे असून हे तिघेही धारावीतील कुंभारवाड्यात राहतात.
दादर चौपाटीवर तीन शाळकरी मुले बुडाली#Mumbai #civic #Dadar #Mumbailive pic.twitter.com/kbGr39nxsP
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) August 5, 2017
शाळेतून सुटल्यानंतर ही तीन मुले पोहण्यासाठी दादर चौपाटीच्या समुद्रात उतरली होती. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांबरोबर हे तिघेही पाण्यात खोल ओढले गेले आणि बुडू लागले. हा प्रकार चौपाटीवर तैनात पोलिसांना कळताच त्यांनी त्वरीत अग्निशमन दलाला माहिती दिली.
त्यानंतर अग्निशमन दल आणि दादर पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. तिघांचेही शव बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)