लोकलनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विनातिकीट प्रवास केल्यावर संबंधित प्रवाशांवर तिकीट तपासनिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसंच, रेल्वे प्रवासादरम्या लोकलमध्येही याबाबत घोषणा केल्या जातात. मात्र, तरीही विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळं या प्रवासांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये एखादा तिकीट तपासनीस नव्हे, तर तिकीट तपासनिसांचे पथकच फिरत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून मागील ६ महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी फुकट्यांची संख्या जास्त असून, त्यांना रोखण्यासाठी लोकलमध्ये तिकीट तपासनिसांसह रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही कार्यरत असणार आहेत.
तिकिटांची तपासणी प्रथम श्रेणीसह, द्वितीय श्रेणी, महिला, मालडबा, दिव्यांगांच्या डब्यातीलही प्रवाशांच्याही तिकिटांची तपासणी होत आहे. तसंच, तिकीट नसल्यास दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
हेही वाचा -
एसबीआयची बचत खात्यावरील व्याजदरात कपात
मुंबईत बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट