पालघर जिल्ह्याच्या मनोर पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झालेत. देविका देवराम फरले (30 ),बाबूराव माणक्या कचरा (36 ),अभिजीत देवराम फरले (10) अशी मृतांची नावे असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ट्रेलक क्रमांक आर.जे 01 / जी.ए.2223 गाडी चालक भरधाव वेगाने बोईसर-चिल्हार रोडवरून जात होता. याच दरम्यान ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि गाडी ट्रक क्रमांक 04/डी.एस 8157 वर आदळली. घटनेची माहिती स्थानिकांनी देतान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कलम 304 (अ ),279,338,337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.