तरूणीचे केस कापले आणि बॅगेत भरून माथेफिरू पसार

दादरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

तरूणीचे केस कापले आणि बॅगेत भरून माथेफिरू पसार
SHARES

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला. तरुणीचे केस कापून मातेफिरू फरार झाल्याची घटना घडली. 19 वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना एका माथेफिरूने तिचे केस कापले आणि हे केस तो बॅगेमध्ये भरून घेऊन गेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी रुपारेल कॉलेजमध्ये शिकते. ही तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती.

दादर रेल्वे स्थानकावर पोहचताच एक तरुण पाठिमागून आला. त्याने गर्दीचा फायदा घेत सोबत आणलेली कात्री काढून तरुणीच्या केसावर फिरवली आणि तिचे केस कापले. यानंतर त्याने तिचे केस बॅगेत भरून सोबत नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दादर रेल्वे स्थानकावर तरुणीचे केस कापल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेतला.

याप्रकरणी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे तपास करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीने त्या तरुणीचे केस का कापले? या मागचे खरे कारण काय? याचा लोहमार्ग पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा

मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार, व्यापारी जखमी

पैसे डबलचा मोह नडला, हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा