धक्कादायक! प्रियकरानं व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानं प्रेयसीची आत्महत्या

प्राथमिक माहितीच्या आधारे, शासकीय रेल्वे पोलिस (GRP) च्या बोरिवली युनिटने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

धक्कादायक! प्रियकरानं व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्यानं प्रेयसीची आत्महत्या
SHARES

प्रियकराने व्हॉट्सअॅपवर प्रेयसीचा नंबर ब्लाॅक केल्याने एका 20 वर्षीय महिलेने मुंबईतील उपनगरी दहिसर (Dahisar) येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या तिच्या प्रियकराच्या घरी गळफास लावून घेतला. वादानंतर प्रियकराने तिचा नंबर ब्लॉक (Block) केल्याचा माहिती पोलिसांना मिळाली.

प्रणाली लोकरे असे या महिलेचे नाव असून पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तीची बॉडी आढळून आली. ती महिला आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नात गेले होते, त्यानंतर महिलेने तिच्या प्रियकरासोबत रात्री त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी मान्य न करता महिलेला घरी जाण्यास सांगितले.

त्याने सांगितले की, यानंतर ती निघून गेली. परंतु लवकरच प्रियकराला फोन करू लागली आणि नंतर तिला त्याच्या घरी यायचे आहे असे सांगितले.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रियकराने तिला असे न करण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की अनेक ड्रग्सचे व्यसनी रात्रीच्या वेळी परिसरात फिरतात आणि नंतर व्हॉट्सअॅपवर तिचा नंबर ब्लॉक केला. पोलिसांनी सांगितले की, ती महिला नंतर त्याच्या घरी पोहोचली आणि व्हॉट्सअॅपवर तिचा नंबर ब्लॉक करण्याबद्दल त्याला विचारपूस केली.

"ती त्याच्या घरी थांबली, पण कथितपणे तिच्या दुपट्ट्याला फास लावला आणि छताला लटकवले," तो म्हणाला. सकाळी जाग आली तेव्हा तिला लटकलेल्या अवस्थेत पाहून धक्काच बसला.

प्राथमिक माहितीच्या आधारे, शासकीय रेल्वे पोलिस (GRP) च्या बोरिवली युनिटने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक

खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा