वरळी हिट अँड रन प्रकर णः आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मिहीर शाह हा एकनाथ शिंदे गटाचे माजी नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.

वरळी हिट अँड रन प्रकर णः आरोपी मिहीर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

मुंबईतील (mumbai) वरळी (worli) अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी 16 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले होते. सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने मिहीरने पोलिसांना दिलेला कबुली जबाब वाचून दाखवत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

7 जुलैला रविवारी पहाटेच्या सुमारास वरळी परिसरात मिहीर शाह (mihir shah) याने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवर स्वार असलेल्या जोडप्याला धडक दिली होती. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता.

वरळीतील (worli) अट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला. नाखवा दाम्पत्य सकाळी ससून डॉकमध्ये त्यांच्या दुचाकीवरून मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना या जोडप्याच्या दुचाकीला आरोपीच्या भरधाव कारने धडक दिली. यात प्रदीप नाखवा एका बाजूला पडले आणि कारने कावेरी नाखवा यांना काही अंतरावर ओढत नेले आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.

या अपघातानंतर मिहीर फरार झाला होता. मात्र दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 9 जुलै रोजी मिहिरला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्याला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी मिहीरची आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली, ती न्यायालयाने मंजूर केली.

60 तासांच्या शोधानंतर अटक

अपघातानंतर मिहीर पळून गेला होता. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी आणि केस कापून मिहीर फरार झाला होता, त्याने त्याचा फोनही बंद केला होता. मात्र 60 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.

पोलीस तपासात मिहीर काय म्हणाला?

अटकेनंतर त्याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दारू पिण्याची सवय सांगितली होती. अपघातानंतर मिहीर शहा वरळीतून (worli) पळून गेला. त्यानंतर तो विरारला जाऊन लपला. आपली ओळख लपवण्यासाठी तो दाढी आणि केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचेही त्याने पोलिस चौकशीत कबूल केले. मिहिर शहा हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाचे माजी नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.



हेही वाचा

अनंत अंबानींच्या लग्नात बॉम्बची धमकी देणाऱ्याला अटक

दिंडोशी, गोरेगाव, विक्रोळी आणि अँटॉप हिलमधील 2000 घरांची म्हाडाची लॉटरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा