मालाड - वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींनी मतदार यादीत नाव नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार जनजागृती नोंदणी अभियान राबवण्यात आले. मालाडच्या एन. एल. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हा अभियान राबवला. या वेळी मारावे रोड ते एस. व्ही. रोडपर्यंत रॅली काढण्यात आली. या अभियानात गोरेगावचे उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद दाते यांनी सहभाग घेत नागरिकांना मतदार नोंदणी करून आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.