Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : अखेर 'त्या' विद्यार्थ्याचा राखीव जागेवरच प्रवेश


मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : अखेर 'त्या' विद्यार्थ्याचा राखीव जागेवरच प्रवेश
SHARES

मुंबईत राहणाऱ्या ऋत्विक डोईफोडे या विद्यार्थ्याला जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं जाणूनबुजून खुल्या प्रवर्गातून जबरदस्तीनं प्रवेश दिल्याचं उघडकीस आलं होतं. त्यासंदर्भात वृत्त मुंबई लाईव्हनं प्रदर्शित केलं होतं. याची दखल घेत सीईटी सेलने ऋत्विकला त्याचा प्रवेश राखीव जागेवरच होईल असं सांगितलं अाहे.


काय आहे प्रकरण

ऋत्विक डोईफोडे या विद्यार्थ्याला सीईटी परीक्षा पास झाल्यानंतर लॉ शाखेसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यानुसार त्याने प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज मागासवर्गीय जातीतून भरला. परंतु, त्याच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्यानं त्याचा प्रवेश खुला प्रवर्गात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यानं जातपडताळणीसाठी असलेल्या अर्जाची पावती असल्याचंही सांगितलं होतं. पण तरीही सीईटी सेलनं त्याची दखल न घेऊन त्याला खुला प्रवर्गातच प्रवेश दिला.  अखेर शनिवारी ऋत्विकची दखल सीईटी सेलनं घेतली असून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची पावती त्याला सादर करायला सांगितली अाहे.  पावती सादर केल्यावर त्याचा प्रवेश अर्ज राखीव जागेवर भरून घेतला.


सीईटी सेलनं घातलेल्या नव्या नियमावलीनुसार विद्यार्थ्याला प्रवेशावेळी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण बंधनकारक करण्यात आलं होत. परंतु, त्याचा नाहक त्रास ऋत्विकप्रमाणेच हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यार्थ्यांची दखल शासनानं तात्काळ घ्यावी, त्यासंबंधी मुदतवाढ व पावती सादर करून प्रवेश देण्याचं परीपत्रक लवकरात लवकर काढावं. अन्यथा स्टुडंट लॉ काऊन्सिलकडून आंदोलन करण्यात येईल.
 - सचिन पवार, अध्यक्ष,  स्टुडंट लॉ काऊन्सिल



हेही वाचा -

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : इस्माईल युसुफच्या विद्यार्थ्यांना मिळाला न्याय

एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा गलथान कारभार : १२७ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा