Advertisement

यंदा 'आयआयटी' प्रवेशासाठी 'ही' अट रद्द

'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच १२वीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात.

यंदा 'आयआयटी' प्रवेशासाठी 'ही' अट रद्द
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा 'आयआयटी'मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांना १२वीच्या परीक्षेत किती गुण मिळाले आहेत, याचा विचार केला जाणार नसून, देशातील सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी १२वीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. 'आयआयटी'मधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. जेईई मेन उत्तीर्ण झालेले दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा देणारे विद्यार्थी देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. असे असले तरी या विद्यार्थ्यांना मिळालेले १२वीचे गुण त्यासाठी ग्राह्य धरले जातात. 

'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच १२वीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. विद्यार्थी १२वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व 'आयआयटी'च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे. 

'आयआयटी' प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त १२वीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १२वीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य आहे.

यंदा कोरोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी १०वी, १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने १२वी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.



हेही वाचा -

Kalyan Dombivali Hotspot List : कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा