राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद मूल्यांकनात यंदा मुबंईतील अनेक कॉलेजला ए ग्रेड मिळाला आहे. गेल्या मूल्यांकाच्या तुलनेत यावर्षी एनएएसीच्या मूल्यांकनात ए दर्जा राखण्यात अनेक महाविद्यालयाला यश आले आहे. रुईया महाविद्यालय, पाटकर, हिंदुजा, सोमय्या, अशा अनेक नामांकीत महाविद्यालयाचा यात समावेश आहे.
देशभरातील कॉलेजचा दर्जा ठरवणाऱ्या एनएएसी कमिटीने कॉलेजचा दर्जा जाहीर केला. यावर्षी मुंबईमध्ये अव्वल स्थानी रुईयामहाविद्यालयाने बाजी मारली आहे. 3.70 गुण मिळवून रुईया महाविद्यालयाने मुबंईत अव्वल स्थान पटकावले आहे. या आधी जाहीर झालेल्या यादीत देखील रुईयाला ए ग्रेड मिळाले होते. त्यावेळी रुईयाला 3.65 गुण होते.
दर पाच वर्षानंतर एनएएसी कमिटीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. एनएएसीचे एक पथक प्रत्येक महाविद्यालयात जाऊन त्याचे मूल्यांकन करते आणि नंतरच त्या महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो.
पुन्हा एकदा अव्वल स्थानी आल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता रुईया महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली आहे. असे असतानाही आम्ही मूल्यांकनात 3.65 गुण मिळवले. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयासाठी एनएएसीचे नियम हे अधिक कडक असतात.
- सुहास पेडणेकर, प्राचार्य रुईया महाविद्यालय