Advertisement

तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार, नवीन नियम लागू

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार, नवीन नियम लागू
SHARES

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. तिसरीपासून ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी परीक्षेचा केरळ पॅटर्न राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

सध्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच, पुढच्या वर्गात पाठवलं जातं. मात्र यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. नापासच होणार नाही, तर अभ्यास करायचाच कशाला, अशी मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये तयार झालीय.

अभ्यासाची, वाचनाची गोडी उरली नसल्यानं शिक्षण पद्धतीत पुन्हा धोरणात्मक बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात शिक्षणाचा 'केरळ पॅटर्न' राबवला जाणार आहे.

पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी लहान असतात. त्यामुळे त्यांना परीक्षा न घेता तिसरीपासून पुढील इयत्तांसाठी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा घेतल्या जाणार असल्या, तरी आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास केले जाणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले. 

इयत्ता तिसरीपासून पुन्हा वार्षिक सराव परीक्षा घेतली जाणाराय. सराव परीक्षेत नापास झाल्यास किंवा कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा होईल
पुढच्या वर्षीपासून या निर्णयाची अमलबजावणी सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षांच्या परीक्षा घेण्यात येतील दर 10 वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा