कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निकाल उशीर झाला. परिणामी ११ प्रवेश प्रक्रीयेला त्याचा फटका बसला. मात्र, आता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आता २६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरून नोंदणी करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी १६ जुलैपासून ११वी प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ खुले करण्यात येणार असून ते २४ जुलैपर्यंत खुले असणार आहे.
प्रवेश प्रक्रीयेवेळी विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज व त्यातील माहिती नष्ट करण्यात येईल आणि २६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्जाचा भाग १ भरण्यास सुरवात होणार असल्याची माहिती मिळते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना १६ जुलैपासून प्रत्यक्ष अर्ज भरून नोंदणी करता येणार होती. आता शिक्षण संचलनालयाकडून मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीया क्षेत्रांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
उपसंचालक कार्यालयांनी ११वी प्रवेशाची कार्यवाही सुधारित वेळापत्रकाप्रमाणं करण्याचे निर्देश शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आले आहेत. ११वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर येत्या २६ तारखेपासून नोंदणी करता येणार आहे. २६ जुलैला सुरु होणाऱ्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन नोंदणी, प्रवेश अर्ज (भाग १) भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक यांनी स्वतः ही प्रक्रिया करायची आहे किंवा पालक शाळांची मदत घेऊ शकतात.
अर्जातील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र निवडणे यासाठी हा टप्पा असणार आहे. २७ जुलैपासून संबंधित शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांना विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज प्रमाणित करता येणार आहेत. या दरम्यान अर्जामध्ये काही त्रुटी किंवा आवशकता असल्यास विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येणार आहे.
राज्य मंडळाचा १०वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग २ भरायचा आहे. यामध्ये प्रवेशासाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम विद्यार्थ्यांना नोंदवून सबमिट आणि लॉक करायचा आहे. विद्यार्थ्यांना हा अर्ज कधीपर्यंत भरता येईल याचा कालावधी दहावीच्या निकालानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा -