Advertisement

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांना कात्री, मुंबईतील काॅलेज १२ दिवस आधीच होणार सुरू

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले काॅलेज यंदा १२ दिवस लवकर सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला कात्री लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांना कात्री, मुंबईतील काॅलेज १२ दिवस आधीच होणार सुरू
SHARES

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले काॅलेज यंदा १२ दिवस लवकर सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला कात्री लागणार आहे. नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत २०१९-२०२० हे शैक्षणिक वर्ष ६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्राध्यापकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 

सुट्ट्या कमी

चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षा मे पर्यंत लांबल्याने सुट्ट्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे पुढचं शैक्षणिक वर्ष उशीरा सुरू करावं अशी मागणी करत प्राध्यापकांनी आंदोलन देखील केलं होतं. परंतु प्राध्यापकांचं न ऐकता विद्यापीठाने ६ जूनपासून नवीन वेळापत्रकर जाहीर केलं आहे. २०१६ मध्ये झालेल्या मूल्यांकन गोंधळापासून विद्यापीठाचं वेळापत्रक कोलमडलं होतं. ते सुरळीत करण्याचा मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

नियमानुसार वेळापत्रक

मुंबई विद्यापीठाने मुख्यत्वे विद्यापीठ अनुदान आयोगा (यूजीसी)च्या नियमानुसार नवं वेळापत्रक तयार केलं आहे. नया वेळापत्रकानुसार प्रत्येक सत्राला ९० शैक्षणिक दिवस मिळतील. त्यानुसार कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचं पहिलं सत्र ६ जून ते २४ ऑक्टोबर या कालावधीत असेल. या सत्रात १०८ शैक्षणिक दिवस असतील. त्यातील ९० दिवस शैक्षणिक, तर उर्वरित १८ दिवस परीक्षांचे असतील. दुसरं सत्र १५ नोव्हेंबर ते २ मेपर्यंत असेल. या सत्रात  १३० शैक्षणिक दिवस असतील.     

पहिलं सत्र - ६ जून - २४ ऑक्टोबर

गणपतीची सुट्टी - २ ते ७ सप्टेंबर

दिवाळीची सुट्टी - २५ ऑक्टोबर - १४ नोव्हेंबर

 

दुसरं सत्र - १५ नोव्हेंबर - २ मे

ख्रिसमसची सुट्टी - २६ डिसेंबर - १ जानेवारी

उन्हाळी सुट्टी - ३ मे - ७ जून



हेही वाचा -

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढ

ICSE : मुंबईची जुही देशात पहिली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा