Advertisement

मुंबई विद्यापीठाला कुलसचिवच नाहीत!


मुंबई विद्यापीठाला कुलसचिवच नाहीत!
SHARES

मुंबई विद्यापीठातल्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. ऑनलाईन असेसमेंटच्या गोधळानंतर आता विद्यापीठाला नव्या अडचणीला समोर जावे लागणार आहे. सध्या विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त आहे. डॉ. एम. ए. खान यांची हज कमिटीवर नियुक्ती झाल्यामुळे विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त झाले आहे. 

अचानक पद रिक्त झाल्यामुळे निकालात पुन्हा एकदा अडथळा निर्माण झाला आहे. कुलसचिवपद रिक्त झाल्याने त्याचा परिणाम काहीसा सिनेट निवडणुकांवरही होणार आहे.

हज कमिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी एकूण 17 उमेदवारांमधून एम. ए. खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तातडीने एम. ए. खान पदभार स्वीकारणार आहेत. तरी कुलसचिव पदावरून मुक्त करण्यासाठी विद्यापीठाकडून ना हरकत पत्र देण्यात आले आहे.


ही पदे आहेत रिक्त

  • प्रकुलगुरू
  • परीक्षा आणि मूल्यमापन संचालक पद

ही पदे रिक्त असतानाच त्यात आता कुलसचिव पदाचीही भर पडली आहे.

कुलसचिव पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे पद विद्यापीठाकडून भरण्यात येणार आहे. कुलसचिव पदाप्रमाणेच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी दुसऱ्यांदा जाहिरात देण्यात आली आहे.



हेही वाच -

160 वर्षांचं मुंबई विद्यापीठ!

'आतापेक्षा मागच्या सरकारमधील मंत्री आणि कुलगुरू बरे होते'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा