Advertisement

एटीकेटी असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थींची परीक्षा जुलै महिन्यात


एटीकेटी असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थींची परीक्षा जुलै महिन्यात
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून, या लॉकडाऊनमुळं विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात मागील सत्रातील विषयांमध्ये एटीकेटी असलेले अंतिम वर्षाचे विद्यार्थी जुलै महिन्यात परीक्षा देऊ शकतात असं नमूद करण्यात आलं होतं.

त्याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, मागील परिक्षेमध्ये एटीकेटी आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा देखील जुलैमध्ये होणार असल्याचं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.विद्यापीठ या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक २० जूननंतर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

त्याचप्रमाण परीक्षा रद्द करण्यात आल्यानं १३ मार्चपर्यंत झालेल्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारण्यात येणार असल्याची माहिती मिळते. काही विद्यार्थ्यांना सेमिस्टरच्या आणि सध्याच्या अंतर्गत परीक्षांवर आधारीत पदोन्नती दिली जाणार आहे. 


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा