Advertisement

दिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी

मुंबई विद्यापीठाचे पुर्नमुल्याकनाचे निकाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे प्राध्यापकांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पेपर तपासणी करावी लागणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीतही प्राध्यापकांना करावी लागणार पेपर तपासणी
SHARES

मुंबई विद्यापीठातील रखडलेल्या निकालांचा फटका विद्यार्थ्यांसहीत शिक्षकांनाही बसतोय. १९ सप्टेंबरला सर्व निकाल जाहीर केल्याचं मुंबई विद्यापीठ मिरवत असले, तरी गहाळ उत्तरपत्रिका आणि पूनर्मूल्यांकनाच्या निकालाचं ओझं अजूनही विद्यापीठावर मानगुटीवर कायम आहे. त्यामुळे गणपतीपाठोपाठ आता प्राध्यापकांची दिवाळीही पेपर तपासण्यातच वाया जाणार आहे. 


५० हजारांहून अधिक निकाल प्रलंबित

मुंबई विद्यापीठाला अद्याप ११ हजार राखीव निकाल आणि ५० हजारांहून अधिक पूनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करायचे आहेत. हा अतिरिक्त भार पेलण्यासाठी प्राध्यापकांना दिवाळीच्या सुट्टीतही पेपर तपासणीचं काम करावं लागणार आहे. या आधी ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करताना प्राध्यापकांनी गणपतीची सु्ट्टी पेपर तपसणीसाठी खर्ची घातली होती.


सत्र परिक्षांचे नियोजनही कोलमडले

विद्यापीठाने सत्र परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालाचा परिणाम पाचव्या आणि सहाव्या सत्र परीक्षांवर झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा आता नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. विद्यापीठात सध्या १६ हजार गहाळ उत्तरपत्रिकांना सरासरी गुण देण्याचं काम सुरू आहे.


प्राध्यापकांना नाहक त्रास

जून महिन्यापासून प्राध्यापकांनी कॉलेजमधील लेक्चर सांभाळून पेपर तपासले. त्यानंतर गणपतीच्या सुट्टीत घरी गणपती असूनही विद्यापीठात येऊन पेपर तपासणी केली. आता दिवाळीच्या संपूर्ण सुट्टीत आम्हाला उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंटचा त्रास आम्हाला सहन करावा लागतोय, असं इथल्या प्राध्यापकांचं म्हणणं आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा