Advertisement

एमबीए, एमसीए परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरु

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) एमएएच-एमबीए, एमएमएस सीईटी आणि एमएएच एमसीए २०२० प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे.

एमबीए, एमसीए परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरु
SHARES

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) एमएएच-एमबीए, एमएमएस सीईटी आणि एमएएच एमसीए २०२० प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. या नोंदवणीला सीईटी सेलच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे.

 हेही वाचा- एमएचटी सीईटी यंदा १० राज्यांत होणार

एमएएच-एमबीए किंवा एमएमएस सीईटी - २०२० ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज १० जानेवारी ते १५  फेब्रुवारीदरम्यान तसंच एमएएच एमसीए सीईटी - २०२० साठीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज १५ जानेवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यान करण्याचं आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आलं आहे. ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

 हेही वाचा- पदव्युत्तर परीक्षेसाठी नजीकचं केंद्र निवडणं अवघड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा